
आठवण तुझी येता..
नाते न जुळले जरि
प्रिया तुझे नि माझे
आठवण तुझी येता..
मन का उदास होते
आठवण तुझी येता
मी सार काही विसरते
तुझ्या स्वप्निल डोळ्यातील
स्वप्न होउन् जगते
आठवण तुझी येता मी
रात्र रात्र जागते
तुझ्या आठवणी कुरवाळत्
उगीच कूस बदलते
तु न झालास माझा
हे स्वीकारले जरी आहे
आठवण तुझी येता
मी तुझ्यात् गुन्तत जाते
न उमगले कधीही हे
असे का घडते
पण आठवण तुझी येता
मी न माझी उरते..
(unknown)