Tuesday, July 31, 2007

अंगणातल्या पायरीवर सहज बसले असता.....


अंगणातल्या पायरीवर सहज बसले असता

आठवले ते सारे

आणि क्षणार्धात डोळे होते पाणावले

सारं काही विसरु पाहत होते मी

तरीदेखील राहीले होते जखमांचे व्रण

आणि होत्या तीव्र वेदनेच्या जाणिवा


कठीण होते तुला विसरणे

कारण खुप खुप प्रेम असतनादेखील

थोडेसे कुठेतरी बिनसतं

त्याने मग नातं अधिकच दुरावतं


पण सहजच विसरावं असं प्रेम नसतं

मनाच्या कोपरयातून्, तरीदेखील कुणीतरी सतत डोकावत असतं

नकळत असं काही घडत जातं

त्याचं भान दोन जीवांना नसतं

असतो केवळ सहवासाचा आधार

आणि त्यातच तर प्रेमाची स्वप्न होतात साकार


तुला विसरावं म्हटलं तरी

मनातून तू जात नाहीस

आठवणींमधून् काढावं म्हटलं तर

तेदेखील जमत नाही


आजही मन तुला आठवणींत ठेवतंय

का कोण जाणे?आणी म्हणूनच की काय

आजहीमाझ्या मनात सतत चालू आहे

तुझे येणे जाणे

(एका संग्रहातून्)