Tuesday, July 31, 2007

पाऊस

पाऊस पडतो तेंव्हा.....पाऊस पडतो तेंव्हाएकच काम करायचं...हातातली कामं टाकुन देउनपावसात जाऊन भिजायचं!आपल्या अंगावर झेलून घ्यायच्याकोसळणार्या धाराश्वासांमध्ये भरून घ्यायचासळाळणारा वाराकानांमधे साठवुन घ्यायचेगडगडणारे मेघडोळ्यांमध्ये भरुन घ्यायचीसौदामिनीची रेघपावसाबरोबर पाऊस बनूननाच नाच नाचायचंअंगणामधे, मोगर्यापाशीतळं होऊन साचायचं!आपलं असलं वागणं बघुनलोक आपल्याला हसतीलआपला स्क्रू ढिला झालाअसं सुध्दा म्हणतीलज्यांना हसायचं त्यांना हसू देकाय म्हणायचं ते म्हणू देत्यांच्या दुःखाच्या पावसामधेत्यांचं त्यांना कण्हू देअसल्या चिल्लर गोष्टींकडेआपण दुर्लक्ष करायचं!म्हणून...पाऊस पडतो तेंव्हाएकच काम करायचं...हातातली कामं टाकुन देउनपावसात जाऊन भिजायचं