Tuesday, July 31, 2007

किती दिवस

कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात. कधी ते ओठांपर्यन्त येतात पण तिथेच अडतात. कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही.असेचकाहीसे 'दुसरी' कडेही होत असेल.....शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच...म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !!किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुनतोही गुलाब जाइल एक दिवस कोमेजुनराहशील फक्त तू जगशील मरुन मरुनम्हणूनच म्हणतो एकदातरीबघ तिला सांगून !किती दिवस बोलणार तू पडद्या आडुनपोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन"थॅंक्स!" म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुनम्हणूनच म्हणतो एकदातरीबघ तिला सांगून !किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुनबोलायला जाता एक वेगळाच विषय काढुनएवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुनम्हणूनच म्हणतो एकदातरीबघ तिला सांगून !रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुनआतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुनमेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुनम्हणूनच म्हणतो एकदातरीबघ तिला सांगून !तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुनएक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुनलग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुनम्हणूनच म्हणतो एकदातरीबघ तिला सांगून !किती दिवस

पाऊस

पाऊस आलाय….भिजून घ्याथोडा मातीचा गंध घ्याथोडा मोराचा छंद घ्याउरात भरून आनंद घ्या..आलाय पाऊस…..भिजून घ्याबघा समुद्र उसळतोयवारा ढगांना घुसळतोयतुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..आलाय पाऊस…..भिजून घ्याऑफ़ीस रोजच गाठत असतंकाम नेहमीच साठत असतंमनातून भिजावंसं वाटत असतंमनाची हौस पुरवून घ्या..आलाय पाऊस…..भिजून घ्यासर्दी पडसे रोजचेच..त्याला औषध तेच तेच..प्यायचेच आहेत नंतर काढे ,आधी अमृत पिऊन घ्या..आलाय पाऊस…..भिजून घ्याबघा निसर्ग बहरलायगारव्याने देहही शहारलायमनही थोडं मोहरून घ्या..आलाय पाऊस…..भिजून घ्या

तू

बरं वाटलं तू आलीस !आज भेटलीस !!रात्री माझ्या बागेत ,रातराणी फ़ुलली होती कारण नसताना, उगाचचं ती बडबड करत बसली होती !तेव्हाच यायला हवं होतं लक्षात,आज तू भेटणार ,इतके दिवस कुठे होतास म्हणून भांड भांड भांडणार भांडून भांडून दमल्यावर ,माझाचं हात हातात धरून,पुन्हा माझ्याचं खांद्यावर डोकं टेकणार !!!!पुन्हा मुक्यानेच होइल संभाषण आपलंपुन्हा पानं फ़ुलं एकतीलआणि मग पुन्हा तुझ्या गालावर लाजेचे ताटवे फ़ुलतील !!जाताना मात्र नको विचारूस पुन्हा कधी भेटायचंअसचं , अवचित , कधीतरीरातराणी सारखं फ़ुलायचं !!!!!!!

काहितरी वेगळ करायचय

काहितरी वेगळ करायचय........ ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय पाणवठा जरी गढुळ असला तरीपुन्हा पाणवठयात येवून नहायचय.काहितरी वेगळ करायचय........ आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचायपानांच्या जाळीवर बसुन उडायचयमिटलेल्या श्वासांना आताअस्तित्वातात आणायचय. काहितरी वेगळ करायचय........ स्वप्नांच्या देशात भटकायचयप्रयोगानिशी शोधायचयभवनेच्या पंखात बळ घेऊनपुन्हा मायदेशी परतायचय. काहितरी वेगळ करायचय........ चिखलातल्या कमळाला फुलवायचयसुकलेल्या फुलांना जगवायचयमाती रुक्ष असलि तरीमातीतल्या माणसांसाठी जगायचय. काहितरी वेगळ करायचय........ एक स्वप्न उराशी बाळगायचयकाहि वेगळ करता नाहि आलं तरि माणसातल्या माणूसकीला मात्र जपायचय

पाऊस

पाऊस पडतो तेंव्हा.....पाऊस पडतो तेंव्हाएकच काम करायचं...हातातली कामं टाकुन देउनपावसात जाऊन भिजायचं!आपल्या अंगावर झेलून घ्यायच्याकोसळणार्या धाराश्वासांमध्ये भरून घ्यायचासळाळणारा वाराकानांमधे साठवुन घ्यायचेगडगडणारे मेघडोळ्यांमध्ये भरुन घ्यायचीसौदामिनीची रेघपावसाबरोबर पाऊस बनूननाच नाच नाचायचंअंगणामधे, मोगर्यापाशीतळं होऊन साचायचं!आपलं असलं वागणं बघुनलोक आपल्याला हसतीलआपला स्क्रू ढिला झालाअसं सुध्दा म्हणतीलज्यांना हसायचं त्यांना हसू देकाय म्हणायचं ते म्हणू देत्यांच्या दुःखाच्या पावसामधेत्यांचं त्यांना कण्हू देअसल्या चिल्लर गोष्टींकडेआपण दुर्लक्ष करायचं!म्हणून...पाऊस पडतो तेंव्हाएकच काम करायचं...हातातली कामं टाकुन देउनपावसात जाऊन भिजायचं

ती

ती जाताना 'येते' म्हणून गेलीअन जगण्याचे कारण बनून गेली!म्हटली मजला 'मनात काही नाही'पण जाताना मागे बघून गेली!तिच्या खुणेची चंद्रकोर ही गालीवार नखाचा हलके करून गेली...घडे क्षणांचे रिते असे केले कीदेहसुखाचा प्याला भरून गेलीकळते हा बगिचा का फुलला माझाकाल म्हणे ती दारावरून गेली!तसे पाहता पाउस तितका नव्हताकळे न का ती इतकी भिजून गेली...तिच्या भोवती गंध अता दरवळतो(सहवासचे अत्तर टिपून गेली!)

काय सांगु माझ्या बद्दल ?

काय सांगु माझ्या बद्दल ?काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीपानात पडेल ते खाल्ल्या शिवायपोटच आमच भरत नाही.काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीबोलायच खुप असत मलापण बोलणं मात्र जमत नाही.काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीदुखवल जात आम्हालादुखवता आम्हाला येत नाही.काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीखोट खोट हसता हसतारडता मात्र येत नाही.काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीदुःखात सुख अस समजतादुःख ही फिरकत नाही.काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीबरोबर बरेच असतातपण एकटेपणा काही सोडत नाही.काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीचार शब्द सांगतोपण कोणी ऐकतच नाही.काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीज्यांना आम्ही मित्र मानतोमित्र ते आम्हाला समजतच नाहीत.काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीखुप काही सांगायचयपण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

प्रेम

ती म्हणाली होती प्रेम आहे माझे तुझ्यावरनाही उमजला अर्थ तेव्हा तिच्या बोलण्याचा माझ्याजवळं ती नाही, आता प्रत्येक आठवण सांधतो आहेन कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधतो आहेकदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले कानपावसात शब्दांच्या चिंबं विसरतातं देह्भानकदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी तीका फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीवकदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळेशब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोलेकदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिलाआजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवलाकदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागरठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझरकदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेलेती निघून गेल्यावर अश्रूंच्या दवबिंदूसंगे मला वेढआता मात्र शब्धही लागतात अपुरे पडूभावनांची गर्दी कशी कागदावर उतरवू ?पण आता कळतयं....प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणेआपले विसरून दुसर्‍याच्या विश्वात रमंणेप्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

आठवण तुझी येता..


आठवण तुझी येता..


नाते न जुळले जरि

प्रिया तुझे नि माझे

आठवण तुझी येता..

मन का उदास होते


आठवण तुझी येता

मी सार काही विसरते

तुझ्या स्वप्निल डोळ्यातील

स्वप्न होउन् जगते


आठवण तुझी येता मी

रात्र रात्र जागते

तुझ्या आठवणी कुरवाळत्

उगीच कूस बदलते


तु न झालास माझा

हे स्वीकारले जरी आहे

आठवण तुझी येता

मी तुझ्यात् गुन्तत जाते


न उमगले कधीही हे

असे का घडते

पण आठवण तुझी येता

मी न माझी उरते..

(unknown)

अंगणातल्या पायरीवर सहज बसले असता.....


अंगणातल्या पायरीवर सहज बसले असता

आठवले ते सारे

आणि क्षणार्धात डोळे होते पाणावले

सारं काही विसरु पाहत होते मी

तरीदेखील राहीले होते जखमांचे व्रण

आणि होत्या तीव्र वेदनेच्या जाणिवा


कठीण होते तुला विसरणे

कारण खुप खुप प्रेम असतनादेखील

थोडेसे कुठेतरी बिनसतं

त्याने मग नातं अधिकच दुरावतं


पण सहजच विसरावं असं प्रेम नसतं

मनाच्या कोपरयातून्, तरीदेखील कुणीतरी सतत डोकावत असतं

नकळत असं काही घडत जातं

त्याचं भान दोन जीवांना नसतं

असतो केवळ सहवासाचा आधार

आणि त्यातच तर प्रेमाची स्वप्न होतात साकार


तुला विसरावं म्हटलं तरी

मनातून तू जात नाहीस

आठवणींमधून् काढावं म्हटलं तर

तेदेखील जमत नाही


आजही मन तुला आठवणींत ठेवतंय

का कोण जाणे?आणी म्हणूनच की काय

आजहीमाझ्या मनात सतत चालू आहे

तुझे येणे जाणे

(एका संग्रहातून्)

मैत्री........

मैत्री ही मोठी अजब चीज आहे. कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात. कधी बरोबरच्या सहकार्‍याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही. अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते. हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो. एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो. 'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला. निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्‍यासारखे असतात. प्रसन्न, ताजे. कदाचित वाट चालून पुढे जाताना झरा अदृष्यही होऊ शकतो. किंवा मार्ग बदलून वाहू शकतो. दैनंदिन जिवन जगताना ही मैत्री मग आपले अस्तित्व दाखवेलच असेही नाही. पण काही हरकत नसते Ashi Maitri havi